वाराणसी : सध्या वाराणसी मतदारसंघाच्या दौ-यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांनी आज सकाळी वाराणसीच्या अस्सी घाटावर स्वच्छ भारत अभियानाला सुरूवात करत साफसफाई केली.
अस्सी घाटावर साफसफाई केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पुढच्या महिन्याभरात हा घाट पूर्णपणे स्वच्छ होईल, अशी आशा व्यक्त केली. याचबरोबर वाराणसीतल्या सामाजिक संस्थांनी तीन महिन्यामध्ये अस्सी घाट स्वच्छ करण्याचे वचन देखील दिले आहे. आज मोदी यांच्या हस्ते वाराणसी शहरात स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचे अनावरण होणार आहे. तसेच आनंदमयी आश्रम आणि रूग्णालयालाही ते भेट देणार आहेत.
मोदींनी स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्यासाठी त्यांनी नऊ जणांची निवड केली असून यात राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह रामभद्राचार्य, मनोज तिवारी, मनुज शर्मा, मोहम्मद कैफ, प्रा. देवीप्रसाद द्विवेदी, राजू श्रीवास्तव, सुरेश रैना, कैलाश खेर यांचा समावेश आहे.






No comments:
Post a Comment